शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तेलगी प्रकरणानंतर २० वर्षांपासून धूळखात पडलेले ३२ कोटी ६८ लाखांचे मुद्रांक नष्ट

By शिवाजी कदम | Updated: December 25, 2023 12:19 IST

तेलगी घोटाळ्यानंतर १०० आणि ५०० रुपयांच्या वर असलेले मुद्रांक रोखण्यात आले होते.

जालना : मुद्रांक शुल्क घोटाळा २००३ मध्ये उघड झाल्यानंतर तत्कालीन सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मुद्रांक सील करण्याचा आदेश दिला होता. आता वीस वर्षांनंतर सील केलेले मुद्रांक नष्ट करण्याचा आदेश मागील महिन्यात राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनास दिले होते. या आदेशानंतर जालना जिल्ह्यातील ३२ कोटी ६८ लाख रुपये दर्शनी मूल्य असलेले ८९ हजार मुद्रांक बुधवारी नष्ट करण्यात आले आहेत.

वीस वर्षांपूर्वी राज्यात अब्दुल करीम तेलगी याने मुद्रांक घोटाळा केल्याचे उघड झाले होते. घोटाळ्यानंतर शासनाने कोषागारातील शिल्लक असलेले विनाक्रमांकाचे स्टॅम्प पेपर विक्री न करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून विविध जिल्ह्यांतील कोषागार कार्यालयात सील केलेले मुद्रांक धूळ खात पडून होते. या घोटाळ्यानंतर प्रत्येक मुद्रांकाला क्रमांक देण्यात येत आहेत, तसेच मुद्रांकाचे डिझाइनही पालटण्यात आले आहे.

राज्य सरकारचा आदेशवीस वर्षांपासून पडून असलेले मुद्रांक नष्ट करण्याचा आदेश यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने दिला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत विशेष समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मुद्रांक नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मोठ्या रकमेचे मुद्रांक राेखलेतेलगी घोटाळ्यानंतर १०० आणि ५०० रुपयांच्या वर असलेले मुद्रांक रोखण्यात आले होते. यात एक हजार, पाच हजार आणि १० हजारांच्या मुद्रांकांचा समावेश होता. मुद्रांक विक्री थांबवल्याचा आदेश तत्कालीन सरकारने दिल्यानंतर मोठ्या रकमेचे बाँड सील करण्यात आले होते.

राज्य शासनाकडून सील केलेले मुद्रांक नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला होता. यानुसार, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बुधवारी नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे.- श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना

 

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना