कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:23+5:302021-02-05T08:05:23+5:30
शेतकऱ्यांची गैरसोय भोकरदन : तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासह इतर कामावर ...

कर्मचाऱ्यांचा सत्कार
शेतकऱ्यांची गैरसोय
भोकरदन : तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासह इतर कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
रस्त्यांची दुरवस्था
परतूर : शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. शहरांतर्गत खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, भांडण तंट्यात वाढ होत आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाहुळेंचे उपोषण मागे
जालना : काशिनाथ पुंजाराम वाहुळे यांनी जामवाडी येथील फेरफार प्रकरणात उपोषण सुरू केले होते. तहसीलदार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.