एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:37+5:302021-07-25T04:25:37+5:30

जालना : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक पसंती दिली जात ...

ST travel safe; So why travels? | एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

Next

जालना : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे. केवळ पैशांची बचत आणि वेळेच्या बंधनामुळेच प्रवासी ट्रॅव्हल्सकडे धाव घेत असल्याचे दिसून येते. परंतु, हे प्रवासी एसटीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात चार आगार आहेत. जवळपास २०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. यात शिवशाही व इतर बसचा समावेश आहे. मागील दीड वर्षापासून एसटी महामंडळ तोट्यात आहे.

एसटीला स्पीड लॉक, टॅव्हल्स सुसाट

‘रापम’च्या बसला स्पीड लॉक असते. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी असते. तर दुसऱ्या बाजूला खाजगी ट्रॅव्हल्स वायुवेगाने सुसाट धावतात. त्यामुळे त्यांचे अपघात होतात. याची नोंदही कोणाकडे ठेवली जात नाही.

दूर जायचे असेेल तर मी आरामासाठी ट्रॅव्हल्सने प्रवास करतो. कारण, ट्रॅव्हल्सने आराम मिळतो. तर जवळ जायचे असेल तर एसटीने प्रवास करतो. कारण एसटीचा प्रवास सुरक्षित असतो.

- नारायण काळे,

ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. त्यामुळे मी दूर जायचे असेल तर ट्रॅव्हल्सने जातो. एसटीचा प्रवास सुरक्षित असला तरी मला ट्रॅव्हल्सने प्रवास करायला आवडते. जवळ जायचे असेल तर मी एसटीने प्रवास करतो.

- वैभव तोडकर

आगार प्रमुखांचा कोट

बसचा प्रवास खाजगीपेक्षा खूप जास्त सुरक्षितच आहे. अपघात, छेडछाड, चोरी या घटना अपवादात्मक घडतात. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतो. तसेच अपघात झालेल्या प्रवाशांना मदतही करतो. प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा.

- प्रमोद नेहूळ, विभाग नियंत्रक, रापम, जालना

Web Title: ST travel safe; So why travels?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.