एसटीने जीवाची मुंबई नाहीच....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:38+5:302021-03-26T04:29:38+5:30
जालन्यातून मुंबईला जाण्यासाठी एकही बस नसून, परतूर मुंबई बस बंद झाली आहे. केवळ जाफराबाद ते कुर्ला ही बस सुरू ...

एसटीने जीवाची मुंबई नाहीच....
जालन्यातून मुंबईला जाण्यासाठी एकही बस नसून, परतूर मुंबई बस बंद झाली आहे. केवळ जाफराबाद ते कुर्ला ही बस सुरू आहे. तर पुसद ते मुंबई ही बस जालन्यातून जात होती. ती देखील आता कोरोनामुळे बंद झाली आहे.
चौकट
प्रवांशाचा प्रतिसाद नसल्याने बंद
जालन्यातून मुंबईला जाण्यासाठी पूर्वी चार ते पाच बसेस होत्या. परंतु प्रवाशांची घटती संख्या आणि कोरोना यामुळे प्रवासी बसने मुंबईला जाणे टाळत आहेत. त्यामुळे सर्व बससेवा बंद केल्या आहेत.
- पंडित चव्हाण, आगार प्रमुख जालना
चौकट
जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढली
जालना जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्या तुलनेने मुंबई, पुणे तसेच अन्य जिल्ह्यातून प्रवासी जालन्यात येण्याचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत कोरोनाच्या कारणाने वाढले आहे.
----------------------
एकही बस नाही
जालना जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी एकही बस नसल्याने रातराणी आणि मुक्कामी बस सेवेचा प्रश्नच निर्माण होत नाही. प्रवासी नसल्याने बुकिंग करून प्रवास करणे हे शक्य नसल्याचे वास्तव आहे.