कोरेाना स्थितीची अधिकाऱ्यांकडून ऑन दी स्पॉट पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:16+5:302021-04-09T04:32:16+5:30
गुरुवारी या पथकाने प्रथम जालन्यातील एसआरपीएफमधील स्वॅब केंद्रासह मिनी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील सोयी-सुविधांचा आढावा ...

कोरेाना स्थितीची अधिकाऱ्यांकडून ऑन दी स्पॉट पाहणी
गुरुवारी या पथकाने प्रथम जालन्यातील एसआरपीएफमधील स्वॅब केंद्रासह मिनी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. जालन्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण असल्याने कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. त्यांनी शिवाजी पुतळा तसेच रूपम हॉलमध्ये उद्योजक स्व. किशोर अग्रवाल, जैन संघटना यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जैन संघटनेचे अध्यक्ष हस्तीमल बंब, उद्योजक अर्जुन गेही, गोवर्धन अग्रवाल आदींची उपस्थिती होती. केंद्रीय पथकाने जालन्याप्रमाणेच राजूर, हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट दिली. केंद्रीय पथकासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले. गजानन म्हस्के, तहसीलदार श्रीकांत भुजबळ आदींची उपस्थिती होती.
चौकट
एकीकडे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी जालना शहरासह भोकरदन तालुक्यात पाहणी केली. तर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन लसीकरणासह अन्य उपाययोजनांचा आढावा घेऊन सूचना दिल्या.