शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांबाबत कारवाईला गती; एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:58 IST

शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांवरील कारवाईच्या मोहिमेला वाहतूक शाखा, नगर पालिका प्रशासनाने गती दिली आहे. शिवाय रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाºया नूतन वसाहत भागातील एकाविरूध्द बुधवारी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या दिसून येतो. मोकाट जनावरांमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघाताला मिळणारे निमंत्रण पाहता या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत होती. या दृष्टीने मागील वर्षीपासून वाहतूक शाखेने पावले उचलली होती. नागरिकांचा रेटा पाहता नगर पालिका, वाहतूक शाखेने गत आठवड्यापासून मोकाट जनावरांवरील कारवाईच्या हालचाली सुरू केल्या होत्या. याबाबत पशुपालकांची बैठकही घेण्यात आली. पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, यासाठी वाहतूक शाखा व पालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय जनावरे कोंडण्यासाठी शहरातील विविध भागांत असलेल्या गो-शाळांची पाहणीही करण्यात आली होती. गोशाळांची पाहणी व पशुपालकांशी संवाद साधून जनजागृती केल्यानंतर कारवाईसाठी पालिकेने पथकाला नियुक्त केले.पालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने सोमवारी १३ तर बुधवारी ४ जनावरे पकडून मोतीबाग येथील पालिकेच्या कोंडवाड्यात टाकली आहेत. संबंधित पशुपालकांना दैनंदिन ७०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. कारवाईनंतर मुदतीत जनावरे सोडवून नेली नाहीत तर संबंधितांच्या जनावरांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच पशुपालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, बुधवारी पोउपनि शेख नजीर शेख नसीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारायण सांडू कांबळे (रा. नूतन वसाहत, अंबड रोड, जालना) यांच्याविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात कलम २८९, २९१ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांनी ३० सप्टेंबर रोजी सकाळी नूतन वसाहत भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे सोडून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून कांबळे विरूध्द गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोकॉ राठोड हे करीत आहेत. रस्त्यावर जनावरे सोडणा-या पशुपालकावर गुन्हा दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. पथकाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदcowगायcivic issueनागरी समस्याTrafficवाहतूक कोंडी