शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

कर्ज न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने कर्ज दिले नाही, अशा शेतक-यांसाठी ८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत विशेष कर्ज पुरवठा मोहीम हाती घेण्यात आली आहे.यासंदर्भात गुरूवारी अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील या योजनेसंदर्भात माहिती दिली. या योजनेंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतक-यांसाठी ही कर्ज पुरवठा योजना असून, या अंतर्गत सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित शेतक-यांनी बँकांना आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे विहित नमुन्यात उपलब्ध करून दिल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी शेतक-यांच्या मागणीनुसार शासनाच्या मर्यादेत राहून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्याचा विचार केला असता एकूण महसूल नोंदीप्रमाणे ५ लाख ३८ हजार शेतकरी आहेत. त्यातील ३ लाख ५५ हजार शेतक-यांकडे किसान कार्ड यापूर्वीच उपलब्ध आहेत. परंतु, १ लाख ७० हजार शेतक-यांनी अद्यापही किसान कार्ड काढलेले नसल्याचे दिसून आले.या वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही पीएम किसान योजनेंतर्गत किसान कार्ड देऊन त्यांना पीककर्ज देण्यासाठीची ही योजना आहे. यासाठी सर्व बँकांनी अशा शेतक-यांना मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी यापूर्वीच घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्याचे परळीकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नाबार्डचे प्रबंधक पी.जी.भागवतकर, मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशितोष देशमुख, सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक सूर्यकांत शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कर्जमुक्ती : १२३९ कोटींचा लाभ मिळणारशासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ६६८ शेतकरी पात्र आहेत. त्यासाठी जिल्ह्याला १२३९ कोटी ७८ लाख रूपये मिळणार आहेत. त्यात जिल्हा बँकेकडे ४६ हजार ६२५ शेतकरी असून, त्यांना १०१ कोटी ८४ लाख रूपये वर्ग करण्यात येतील.४यासह विविध राष्ट्रीय्ीाकृत बँकांमधील शेतकºयांची संख्या १ लाख ९ हजार ३३७ एवढी आहे. त्या शेतक-यांना ८७९ कोटी ९४ लाख रूपये मिळतील. तर ग्रामीण बँकेकडे ३४ हजार ९२६ शेतकरी असून, त्यांना २६८ कोटी रूपये वर्ग करण्यात येणार आहेत.दीड लाख शेतक-यांची माहिती अपलोडशासनाच्या कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत कर्ज खात्याशी आधार लिंक केलेल्या दोन लाख रूपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या १ लाख ७७ हजार २२८ शेतक-यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना