आव्हाना परिसरात ज्वारीचे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:36+5:302021-04-01T04:30:36+5:30
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हानासह परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जोमात आले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. ज्वारीचे ...

आव्हाना परिसरात ज्वारीचे पीक जोमात
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हानासह परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जोमात आले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. ज्वारीचे पीक जोमात आल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
भोकरदन तालुक्यातील आव्हानासह परिसरातील भिवपूर, गोकुळ, मालखेडा, सुभानपूर, पेरजापूर, दहिगाव मुठाड, तांदूळवाडी या गावांमधील शेतकरी पावसाळ्यात ज्वारीचे पीक घेत होते. परंतु, पावसाळ्यात ज्वारीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड पडत असल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत होती. यामुळे झालेला खर्चही शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ज्वारीची पेरणी न करता रब्बी हंगामात पेरणी केली आहे. आता सध्या हे पीक जोमात आले आहे. यंदा शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. पीक चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भावही मिळण्याची अपेक्षा आहे.
सुरुवातीला मी पावसाळ्यात ज्वारीची पेरणी केली होती. परंतु, ज्वारीवर कीड पडत असल्याने झालेला खर्चही निघत नाही. त्यामुळे रब्बी हंगामात हायब्रीड ज्वारीची लागवड केली आहे. यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
नाना गावंडे, शेतकरी, भिवपूर,