..तर लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:50+5:302021-08-24T04:33:50+5:30
देऊळगाव राजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत धनगर समाजासाठी ३.५ टक्क्याच्या प्रमाणात जागा न ...

..तर लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही
देऊळगाव राजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत धनगर समाजासाठी ३.५ टक्क्याच्या प्रमाणात जागा न देऊन शासनाने अन्याय केला आहे. या परीक्षेत समाजाला न्याय मिळाला नाही तर परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिला.
देऊळगाव राजा येथे आयोजित बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धनगर समाजाला ३.५ टक्क्यांच्या प्रमाणात जागा मिळाव्यात यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रामदास गुरव, सुनील मतकर, अक्षय गाटोळे, विशाल गाटोळे, भरत आटोळे, गजानन जोशी, चौरे, गोरे, सावळे व इतरांची उपस्थिती होती.
धनगर समाज आरक्षण, समाजाचे प्रश्न, समस्यांकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ राजकारणासाठी व स्वार्थासाठी समाजाचा समाजातील काही लोक व राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरता वापर करत आहेत. समाजाच्या मूळ प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका आल्या की धनगर समाजाला प्रलोभने देऊन राजकीय सत्ता मिळवतात. मात्र निवडणुका संपल्या की त्यांना धनगर समाजाच्या प्रश्नांचा विसर पडतो. धनगर समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनगर ऐक्य परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही डॉ. शशिकांत तरंगे यांनी सांगितले.
फोटो