सहावा दिवस ; साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:22+5:302021-02-05T08:01:22+5:30
जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी २० ...

सहावा दिवस ; साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचा निर्धार
जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी २० जानेवारीपासून अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. या आंदोलनास आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. नारायण कुचे, शिवसेना नेते हिकमत उढाण, स्वाती नखाते, पूजा मोरे, पुजा पाटील आदींनी भेटी दिल्या.
मागील काही वर्षांपासून मराठा समाजातील नागरिकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने केली आहेत. असे असतानाही शासनाकडून दखल घेतली जात नाही. शासनाने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, यासाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी २० जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी या आंदोलनाचा सहा दिवस आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लहान्यांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वचजण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मंगळवारपासून ग्रामस्थ अन्नदात्या आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. रविवारी घनसावंगी, गेवराई, अंबड, पाटोदा, आष्टी व जालना येथील तरूणांनी दुचाकी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.