सोळा वर्षीय मुलीस फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:40+5:302021-02-05T08:00:40+5:30
आंदोलनाला पाठिंबा जालना : जालना जिल्हा चार्टर्ड अकाउंटंट संघटनेने जीएसटी कायद्यातील जाचक दुरुस्त्याविरुद्ध शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन ...

सोळा वर्षीय मुलीस फूस लावून पळविले
आंदोलनाला पाठिंबा
जालना : जालना जिल्हा चार्टर्ड अकाउंटंट संघटनेने जीएसटी कायद्यातील जाचक दुरुस्त्याविरुद्ध शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला जालना जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला असल्याचे प्रभारी अध्यक्ष विनीत सहानी यांनी सांगितले.
वृक्षारोपण करून प्रजासत्ताक दिन साजरा
देऊळगाव राजा : येथील डॉ.काबरा सहकार विद्या मंदिर शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी विविध ७२ जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बुलडाणा अर्बनचे सीएमडी डॉ.सुकेश झंवर, वनक्षेत्रपाल एस.एस. दुबे, एस.डी. गव्हाणे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, डॉ.गणेश मांटे, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी जगन्नाथ डोईफोडे, वनश्री जनाबापू मेहेत्रे, ज्ञानेश्वर देशमाने, संजय कुलकर्णी, कृष्णा सवडे, डॉ.काबरा, डॉ.दायमा, संजू डोणगावकर, डॉ.अमित काबरा, वाघ महाराज आदी उपस्थित होते.
उघड्या गटारींवर ढापे बसविण्याची मागणी
जालना : शहरातील ठिकठिकाणच्या उघड्या गटारीवर ढापे बसविण्याची मागणी ॲड.महेश धन्नावत यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली असून, यासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भरतनगर, दादीचा चौक, टाऊन हॉल, कालीकुर्ती यासह विविध ठिकाणी उघडे गटार आहेत. लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
सुरक्षा दलासाठी गीता घनवट हिची निवड
मंठा : स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी गीता बालासाहेब घनवट हिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. तिने आंतर महाविद्यालय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भाग घेऊन जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या निवडीबद्दल सभापती कपिल आकात, प्राचार्य. भारत खंदारे, प्रा.सदाशिव कमळकर, डॉ.नेताजी मुळे यांनी कौतुक केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
अंबड : अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील मत्स्योदरी विद्यालयात अंबड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष दिनेश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच भुजंग वाघ, नारायण सावंत, सोनाजी गाढे, सीताराम बोडखे, मुख्याध्यापक एल.आर. जाधव, शिक्षक एन.टी. राजपूत, पी.व्ही. बुलबुले, डी.बी. कुरील, ए.एम. डोरले, बी.एन. सरोदे, एन.यू. शेख, बी.टी. कोळी, ए.बी. गायकवाड, बी.आर. वाघुंडे, पी.एस. बोडखे उपस्थित होते.
विविध मागण्यांसाठी उपोषण
हसनाबाद : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, अवैध वाळू उपसा थांबविण्यात यावा, यासाठी विविध मागण्यांसाठी शिरसगाव वाघरूळ येथे राष्ट्रीय बहुजन क्रांती सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाडे यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. नायब तहसीलदार तांगडे यांनी भेट देऊन चर्चा केली आहे. मागणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
लघुलेखक बी. एस. गिरी यांचा सत्कार
जालना : जिल्हाधिकारी कार्यालयातील लघुलेखक (उच्चश्रेणी) बी.एस. गिरी यांना निवडश्रेणी पदोन्नती मिळाली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याबद्दल आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर बोर्डे, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख, उद्योजक गोविंद रांदड, मुकुंद गंगाखेडकर, नारायण गजर आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
जांबसमर्थ येथे निधी संकलनासाठी दिंडी
घनसावंगी : जांबसमर्थ येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीकडून निधी संकलन करण्यात आले. या निमित्ताने जांबसमर्थ येथे दिंडी काढण्यात आली. नागरिकांच्या वतीने संपूर्ण गावामधून शोभायात्रा काढण्यात येऊन महाआरती करण्यात आली. या शोभायात्रेत भगवे ध्वज, मृदंग घेऊन गावकरी स्त्री-पुरुष, बालक मोठ्या संख्येने सहभागी होते. ठिकठिकाणी सडा-रांगोळी काढून पालखीचे पूजन करण्यात आले.