लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा बोर्डाने अधिकची खबरदारी घेतली आहे. असे असतांनाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॉपी बहादर कॉप्या करीत आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ६ विद्यार्थ्यांना कॉपी करतांना पकडण्यात आले.दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत.कितीही सूचना दिल्यानंतरही विद्यार्थी मोठ्या चालाकिने कॉपी करत आहे. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. मंगळवारी परतूर तालुक्यातील जि.प.शाळेत भरारी पथकाने अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एका विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळून आली.तसेच भोकरदन तालुक्यातील तालुक्यातील वालसावंगी येथील बालाजी माध्यमिक विद्यालयात भरारी पथकाने भेट दिली.यावेळी ५ विद्यार्थी कॉपी करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी ६ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बोर्ड कॉपी मुक्त परीक्षेचा दावा करत आहे. परंतु, सर्रास विद्यार्थी कॉप्या करत असल्याचे दिसत आहे.
सहा विद्यार्थी रेस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:06 IST