४,१८२ जणांच्या तपासणीत सहा जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST2021-08-22T04:32:58+5:302021-08-22T04:32:58+5:30
जालना : शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनाला शनिवारी ४,१८२ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त ...

४,१८२ जणांच्या तपासणीत सहा जणांना बाधा
जालना : शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनाला शनिवारी ४,१८२ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये सहा जणांना बाधा झाल्याचे समोर आले असून, पॉझिटिव्हिटी रेट ०.१४ वर गेला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या चार जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाला शनिवारी ४,११८ जणांच्या आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात सहा जणांना बाधा झाल्याचे समोर आले असून, याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ आला आहे. तर अँटिजनच्या ६४ तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील एक, नेर येथील एकाचा समावेश आहे, तसेच मंठा तालुक्यातील नान्सी १, घनसावंगी तालुक्यातील भद्रेगाव १, भोकरदन शहरातील एकाला बाधा झाली आहे, शिवाय बुलडाणा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर अंबड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अलगीकरणात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात ७८ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सध्या ७८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काहींवर रुग्णालयात तर काहींवर अलगीकरणात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ६९४ वर गेली असून, त्यातील १,१८६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर ६० हजार ४३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.