खडकेश्वर येथे दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:23+5:302021-04-24T04:30:23+5:30

जालना : अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. ...

Six accused arrested for robbery at Khadkeshwar | खडकेश्वर येथे दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद

खडकेश्वर येथे दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद

जालना : अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. चांदया नभ्या भोसले (रा. हिरडपुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद), महेंद्र अंगद पवार (रा. रामगव्हाण), अभिषेक भैया चव्हाण (रा. कौठाळा), प्रकाश पन्नू पवार (रा. चंदनापुरी), संतोष रायभान भोसले (रा. खंडाळा), कामठ भैया चव्हाण (रा. कौठाळा), अशी आरोपींची नावे आहेत.

खडकेश्वर येथील सचिन पंडित जाध‌व यांच्या खोपीवर दरोडा टाकून कुटुंबीयांना मारहाण केली होती, तसेच सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार चांदया भोसले याने साथीदारांच्या मदतीने केला आहे आणि तो २३ एप्रिल रोजी कोळी बोडखा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली. सर्व आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोनि. एस.डी. हुंबे, सपोनि. शिवाजी नागवे, पोहेकॉ. कल्याण अटोळे, पोहेकॉ. विष्णू चव्हाण, पोना. मगरे, बघाटे, बावणे, तंगे, चौधरी, पोना फलटणकर आदींनी केली आहे.

Web Title: Six accused arrested for robbery at Khadkeshwar