एकाच दिवसात ८६८ जणांनी घेतली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:02+5:302021-02-05T08:05:02+5:30
जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेत गुरुवारी एकाच ...

एकाच दिवसात ८६८ जणांनी घेतली कोरोनाची लस
जालना : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेत गुरुवारी एकाच दिवशी तब्बल ८६८ जणांनी लस घेतली. यामध्ये ७४ डॉक्टरांसह ७९४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जालना येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्यासह २४ डॉक्टर व ५३ कर्मचारी अशा एकूण ७७ जणांनी लस घेतली. अंबड उपजिल्हा रुग्णालयात पाच डॉक्टर व ११४ कर्मचारी अशा एकूण ११९ जणांनी, भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाच डॉक्टर, ७४ कर्मचारी अशा एकूण ७९ जणांनी लस घेतली. मंठा ग्रामीण रुग्णालयात १० डॉक्टर, ७३ कर्मचारी अशा एकूण ८३ जणांनी; तर पिंपळगाव रेणुकाई आरोग्य केंद्रात १०३ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दीपक रुग्णालयात ८ डॉक्टर व ४१ कर्मचारी अशा एकूण ४९ जणांनी लस घेतली. बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाच डॉक्टर, ९७ कर्मचारी अशा एकूण १०२ जणांनी; तर जाफराबाद येथे पाच डॉक्टर व १०८ कर्मचारी अशा एकूण ११३ जणांनी लस घेतली. जालना येथील मिशन रुग्णालयात ११ डॉक्टर, ३२ कर्मचारी अशा एकूण ४३ जणांनी; तर घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात एक डॉक्टर व ९९ कर्मचारी अशा १०० जणांनी लस घेतली. नोंदणीकृत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आजवर ४३८० जणांचे लसीकरण
जिल्ह्यातील आरोग्य विभागातील ४३८० जणांचे आजवर लसीकरण करण्यात आले आहे. यात ५०२ डॉक्टर, ३८७८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. नोंदणीकृत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(फोटो)