श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:03+5:302021-02-05T08:04:03+5:30
सूचना फलक बसविण्याची मागणी जाफराबाद : तालुक्यातील राज्य महामार्गासह ग्रामीण मार्गावरील अपघातप्रणव क्षेत्रावर सूचना दर्शविणारे फलक गायब झाले आहेत. ...

श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी यात्रा
सूचना फलक बसविण्याची मागणी
जाफराबाद : तालुक्यातील राज्य महामार्गासह ग्रामीण मार्गावरील अपघातप्रणव क्षेत्रावर सूचना दर्शविणारे फलक गायब झाले आहेत. सूचना फलक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे, शिवाय अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकही नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन सूचनाफलक, दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी केली जात आहे.
पोलीस बॉइज असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर
जालना : येथील पाेलीस बॉइज असोसिएशनची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्हाध्यक्ष सचिन राठोड यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार राऊत, सचिव पवन काकड, कार्याध्यक्ष करण शिंदे, जालना शहराध्यक्ष आकाश मोरे, शहर उपाध्यक्ष ऋषिकेश पांचाळ, जिल्हा महिलाप्रमुख प्रियंका पवार यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.