श्रावण सरींनी जिल्हा व्यापला : नदी-नाल्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:18+5:302021-08-20T04:34:18+5:30
असे असले तरी एकूणच जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष हा आजही कायम असून, किंमतकर समितीसह विजय केळकर समितीने दिलेल्या अहवालाकडे सोयीस्कर ...

श्रावण सरींनी जिल्हा व्यापला : नदी-नाल्यांना पूर
असे असले तरी एकूणच जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष हा आजही कायम असून, किंमतकर समितीसह विजय केळकर समितीने दिलेल्या अहवालाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने आज जुने प्रकल्प वगळता अन्यत्र मोठा एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. आता जालना तालुक्यातील हातवन येथील साठवण तलावासाठी २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु तेथेही भूसंपादनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. बापकळ या गावाचे पूर्णपणे पुनर्वसन करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
दुधना प्रकल्प म्हणजे पारिजातकाचे झाड
जालना जिल्ह्यात असलेला निम्नदुधना प्रकल्प हा सर्वात माेठा प्रकल्प आहे. त्यावर ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च झाला आहे. हा संपूर्ण सिंचनाचा खर्च म्हणून जालना जिल्ह्याच्या नावावर पडला आहे. परंतु या प्रकल्पाचे केवळ बॅक वॉटर जालना जिल्ह्याला आणि विशेष करून परतूर तालुक्यालाच मिळत आहे. हा दुधना नदीवरील प्रकल्प खऱ्या अर्थाने परभणीसाठी उभारला गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे पारिजातकाच्या झाडाप्रमाणे आहे. पारिजातकाचे झाड हे जेथे असते तेथे त्याची फुले पडत नाहीत, ती शेजारील जागेवर पडतात. तसा हा निम्नदुधना प्रकल्प म्हणावा लागेल.