गोळीबार प्रकरण ; आठ महिन्यांनंतर तौर ठाण्यात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:41+5:302021-02-24T04:32:41+5:30
बक्षिसाचे आमिष दाखवून एकास गंडावले जालना : जालना येथील ओमप्रकाश केशवराव शिंदे यांना एका भामट्याने मोबाइलवर वारंवार फोन करून ...

गोळीबार प्रकरण ; आठ महिन्यांनंतर तौर ठाण्यात हजर
बक्षिसाचे आमिष दाखवून एकास गंडावले
जालना : जालना येथील ओमप्रकाश केशवराव शिंदे यांना एका भामट्याने मोबाइलवर वारंवार फोन करून बक्षीस लागल्याचे आमिष दाखविले होते. तुम्हाला लागलेले बक्षीस सोडविण्यासाठी कस्टम ड्युटी चार्ज आणि कुरियर खर्च ३५ हजार रुपये एका बँक खात्यात भरावे लागले, असे त्याने शिंदे यांना सांगितले. शिंदे यांनी त्याच्या खात्यावर सोमवारी दुपारी ३५ हजार रुपये जमा केले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुुढील तपास पो.नि. संजय देशमुख हे करीत आहेत.
घरासमोर उभी केलेली दुचाकी जाळली
जालना : घरासमोर उभी केलेल्या दुचाकीला एकाने आग लावून जाळून टाकल्याची घटना सोमवारी जालना तालुक्यातील बापकळ येथे घडली. याप्रकरणी अमोल दत्तात्रय ईनकर यांच्याफिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष विश्वनाथ ईनकर (बापकळ, ता. जि. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.हे.कॉ. जाधव हे करीत आहेत.
अपघातात एक ठार
जालना : भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरोने स्कुटीला पाठीमागून धडक दिल्याची घटना २७ जानेवारी रोजी जालना ते देऊळगावराजा रोडवर घडली होती. या अपघातात दीपक दत्तात्रय वाढेकर (वय २५, रा. जामवाडी ) हे ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी दत्तात्रय वाढेकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बद्री नारायण साबळे (रा. धावेडी, ता.जि. जालना) याच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आनंदवाडी येथे महिलेची आत्महत्या
जालना : नातेवाइकांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आनंदवाडी पिरकल्याण येथे २१ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी लक्ष्मण बबन वाळूज (२७) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बाबासाहेब काशीनाथ वाळुज, मयताचा चुलत भाऊ श्याम बाबासाहेब वाळुज, भागवत बाबासाहेब वाळुज, राम बाबासाहेब वाळुज, एक महिला (रा. आनंदवाडी पिरकल्याण, ता.जि. जालना) यांच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि वडते हे करीत आहेत.
एकास मारहाण
जालना : किरकोळ कारणावरून एकास पाच जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पेन्शनपुरा येथे घडली. याप्रकरणी शेख नईम शेख लाला यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख नईम शेख बाबू, नदीम शेख इकबाल, कलीम शेख इकबाल, माजीद शेख इकबाल, बानो शेख मुस्ताख (सर्व रा. पेंशनपुरा, ता. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मगरे हे करीत आहेत.