शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंबडच्या एसबीआय बँकेत धक्कादायक चोरी; काउंटरवरून २ लाख ३० हजारांची रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:51 IST

चोरीची ही घटना थेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, बँकेतील सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

अंबड (जालना): शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून तालुक्यातील शेवगा येथील रहिवासी रामेश्वर गणेश बारहाते यांचे २ लाख ३० हजार रुपये भरदिवसा काउंटरवरून चोरी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ९) दुपारी १.३५ वाजता घडली. चोरीची ही घटना थेट बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, बँकेतील सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, रामेश्वर बारहाते हे बुधवारी दुपारी  १.३५ वाजता बँकेच्या काउंटरजवळ व्यवहार करत होते. त्यांनी २ लाख ३० हजार रुपये असलेली पिशवी काउंटरवर ठेवत आपला क्रमांक येण्याची वाट पाहत होते. याच वेळी त्यांच्या पाठीमागून एकजण आला. बारहाते यांचे समोर लक्ष असल्याचे पाहून संधी साधून त्याने रोख रक्कम असलेली पिशवी अलगद पळवली. घटनेनंतर तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व तपास पथक गुरुवारी बँकेत दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असून, आरोपींच्या ओळखीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे बँकेतील सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता ही बँकेची जबाबदारी असतानाही, सुरक्षा कर्मचारी किंवा प्रणालीच्या असमर्थतेमुळे ही चोरी घडल्याचे स्पष्ट होत आहे. ग्राहकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित बँकेने तात्काळ सुरक्षा उपाययोजना बळकट कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाtheftचोरी