शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

धक्कादायक! जालन्यात सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला

By विजय मुंडे  | Updated: April 2, 2025 11:37 IST

पोलिसांचे पथक फरार सुनेच्या मागावर आहे.

जालना: शहरातील भोकरदन नाका येथे सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.सविता संजय शिनगारे ( ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितल्या नुसार, प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे यांच्यासोबत किरायच्या घरात राहत. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून बुधवारी पहाटे सुनेने सासूच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत प्रतीक्षा मृतदेह सोडून फरार झाली होती. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, सदरबाजार पोलिस ठाण्याचे पोनि. संदीप भारती व इतरांनी भेट देवून पाहणी केली.

मृतदेह विल्हेवाट लावण्याचा होता हेतूसून प्रतीक्षा यांनी सासू मृत्युमुखी पडल्याचे पाहताच मृतदेह पोत्यात भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पोते घराच्या बाहेर काढत असताना प्रतिक्षाला घर मालकाने पाहिले. पोते अवजड असल्याने प्रतिक्षाला ते बाहेर नेता आले नाही. यातच घर मालकाला संशय आल्याचे लक्षात येताच प्रतीक्षा तेथून फरार झाली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज घेतले आहेत. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना