कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवशाही बंद; महामंडळाला ९ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST2021-04-06T04:28:58+5:302021-04-06T04:28:58+5:30

राज्यात मध्यंतरी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या गत महिन्यापासून झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात ...

Shivshahi closed due to increasing prevalence of corona; 9 lakh blow to the corporation | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवशाही बंद; महामंडळाला ९ लाखांचा फटका

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवशाही बंद; महामंडळाला ९ लाखांचा फटका

राज्यात मध्यंतरी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या गत महिन्यापासून झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाला मोठे नुकसान होत आहे. जालना येथून सुटणाऱ्या बहुतांश बस बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे जालना जिल्ह्यातून सुटणाऱ्या ८ शिवशाही बसही बंद करण्यात आल्या आहेत. या शिवशाहीमुळे एसटी महामंडळाला महिन्याला ९ लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, आता बस बंद झाल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.

पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या

देशात पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम एसटी महामंडळावर होत असून, पुण्याला जाणाऱ्या गाड्या रिकाम्या जात आहेत.

शिवशाहीचे उत्पन्न घटले

गतवर्षीपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाली होती. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने प्रवासी शिवशाहीने प्रवास करीत नाही. त्यामुळे वर्षभरापासून शिवशाहीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.

पुणे, मुंबईहून येणाऱ्यांची संख्या वाढली

पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूरसह इतर मोठ्या शहरांत कामासाठी गेलेले लोक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या गावी परतत आहेत. हे लोक एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करीत असल्याने त्याचा एसटी महामंडळाला फायदा होत आहे.

औरंगाबाद व मुंबई, पुणे येथून सर्वाधिक प्रवासी येत आहेत.

जिल्ह्यातील शिवशाही बसची संख्या

सध्या सुरू असलेल्या बस

००.

Web Title: Shivshahi closed due to increasing prevalence of corona; 9 lakh blow to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.