अंबड येथे शिवसेनेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST2020-12-23T04:26:41+5:302020-12-23T04:26:41+5:30
अंबड : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. होऊ ...

अंबड येथे शिवसेनेची बैठक
अंबड : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवावा, असे आवाहन चोथे यांनी यावेळी केले. तसेच गावस्तरावरील आपापसातील भेद बाजूला सोडून पक्षाच्या पॅनलला विजयी करण्यासाठी एकत्रित काम करावे,असेही त्यांनी सांगितले. बैठकीत माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, पंडित भुतेकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, तालुकाप्रमुख अशोक बेर्डे, तालुका संघटक दिनेश काकडे, युवासेना तालुकाधिकारी राम लांडे, उपतालुकाप्रमुख रावसाहेब पवार, विभागप्रमुख गजानन सानप, परमेश्वर वाघुंडे, अशोक गिरी, शिवाजी टारगे, कल्याण टकले यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.