शिंदे यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:47+5:302021-02-05T08:02:47+5:30
अवैध वाळू उपसा, वाहतूक जोमात अंबड : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा, वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...

शिंदे यांचे यश
अवैध वाळू उपसा, वाहतूक जोमात
अंबड : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा, वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध वाळूच्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, सर्वसामान्यांना चढ्या दराने वाळूची विक्री केली जात आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
तीर्थपुरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायकवाडी वसाहतचे मुख्याध्यापक अशोक कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी मुक्ताराम बोबडे, शैलेंद्र पवार, रमेश बोबडे, ईश्वर शेवाळे, राजगुरू, तात्यासाहेब चिमणे, अंकुश बोबडे, बंडू उडान, कैलास जारे, तुषार पवार, उदय उडान, प्रशांत बोबडे, पांडुरंग चिमणे आदींची उपस्थिती होती.
खड्ड्यांमुळे रस्ता अपघातात वाढ
भोकरदन : तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्ता अपघातात वाढ झाली असून, अनेकांना हाडाचे आजार जडू लागले आहेत. शिवाय वाहनांचे होणारे नुकसानही वेगळेच आहे. वेळोवेळी मागणी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तरी संबंधितांनी रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
जालना : मिटकॉन प्रशिक्षण केंद्र व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिरास प्रतिसाद मिळाला. यावेळी उपायुक्त डॉ. एस. के. कुरेवाड, डॉ. अमितकुमार दुबे, पशुधन विकास अधिकारी डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुनील खोडके, डॉ. रवींद्र राठोड, मिलिंद सावंत, बबन बोर्डे, ऋषिकेश दांडगे आदींची उपस्थिती होती.