रोपस्किपिंग स्पर्धेत नेरच्या शेख मुजम्मीलला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:28+5:302021-03-31T04:30:28+5:30
पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुजम्मीलने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून ३० सेकंद स्पीड रिले प्रकारात भारतात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक ...

रोपस्किपिंग स्पर्धेत नेरच्या शेख मुजम्मीलला सुवर्णपदक
पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुजम्मीलने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून ३० सेकंद स्पीड रिले प्रकारात भारतात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले, तर स्पीड स्प्रिंट प्रकार तृतीय क्रमांक मिळवून कास्य पदक मिळविले. तो मागील नऊ वर्षांपासून राष्ट्रीय प्रशिक्षक उमेश खंदारकर यांच्या मार्गदर्शनखाली सराव करत आहे. त्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आशियाई स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य असे एकूण ७६ पदके जिंकली आहेत. या यशाबद्दल त्याचे जि. प. सदस्य भागवत अंकल उफाड, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चांद पी. जे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. गौतम सोनवणे, डाॅ. संतोष धोत्रे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी यांच्यासह नेर येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांनी कौतुक केले.