शेख महेमूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:53 IST2018-02-27T00:53:38+5:302018-02-27T00:53:41+5:30

जालना शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शेख महेमूद यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अखेर शिक्कामोर्तब आहे. तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Sheikh Mahmood becomes congress city president | शेख महेमूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब

शेख महेमूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: जालना शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शेख महेमूद यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अखेर शिक्कामोर्तब आहे. तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक अधिकारी म्हणून भास्कर घायवट यांची नियुक्ती केली. त्यांनी नियमानुसार निवडणूक घेतली. शहराध्यक्ष निवडीचे अधिकार गोरंट्याल यांना दिले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून शहराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रियेने शेख महेमूद यांचे नाव सुचविले. यास प्रदेशाध्यक्षांनी मान्यता दिली आहे. या वेळी माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे, गणेश राऊत, बदर चाऊस, राम सावंत, अशोक भगत, संजय भगत, वैभव उगले, रोहित बनवस्कर, मोहन इंगळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Sheikh Mahmood becomes congress city president