हिंदू संत सभेच्या जिल्हाध्यक्षपदी शास्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:05+5:302021-02-05T08:04:05+5:30
प्लास्टीक कचऱ्याचे प्राधान्याने संकलन जालना : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील सदरबाजार झोनमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी इतर कचऱ्यासह ...

हिंदू संत सभेच्या जिल्हाध्यक्षपदी शास्त्री
प्लास्टीक कचऱ्याचे प्राधान्याने संकलन
जालना : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील सदरबाजार झोनमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी इतर कचऱ्यासह प्लास्टीक कचरा संकलनावर भर देण्यात आला. या उपक्रमात नगरसेवक किशोर गरदास, महेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे, सतीश पाजगे, विलास गावंडे, राधेश्याम लोखंडे, नीलेश शंकरपेल्ली, संदीप वानखेडे, ऋषिकेश शेडूत यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला.
हस्तपोखरी गावात विविध कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी येथे संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी संजय महाराज, सुदर्शन शिंदे, अशोक चेपटे, उद्धव घुगे, भागीनाथ साठे, किसन घुले, चंद्रभान गायकवाड, कल्याण घुगे यांच्यासह ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
अंबड : खरीप हंगामातील पीक कर्जापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. आता रब्बी हंगामातही अनेकांनी उसनवारी करून, खासगी कर्ज घेऊन पेरणी केली आहे. किमान रब्बीतील पीककर्ज मिळावे, यासाठी तालुक्यातील शेतकरी बँकेत गर्दी करताना दिसून येत आहेत. बँकेने तत्काळ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या सूचना प्रशासनाने देण्याची मागणी होत आहे.