छायांकित फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:40+5:302021-01-01T04:21:40+5:30
फोटो चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून सत्कार जालना : चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचा सत्कार ...

छायांकित फोटो
फोटो
चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून सत्कार
जालना : चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रमेशचंद सोनी, अशोक हुरगट, अशोक सहानी, विजय बगडिया आदींची उपस्थिती होती.
शकुंतला कुटे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार
जालना : जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात सेवक पदावर कार्यरत असलेल्या शकुंतला कुटे या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल त्यांचा जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सत्कार केला. याप्रसंगी कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, देशपांडे, चव्हाण, मुळे, गणेश कुटे, दत्ता कुटे आदींची उपस्थिती होती.
फोटो
महात्मा फुले चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
भोकरदन : शहरातील सिल्लोड-भोकरदन महामार्गावरील महात्मा फुले चौकातील अतिक्रमण हटवण्याचे मागणी मंगळवारी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाला केली आहे. या निवेदनावर माजी राजेंद्र दारूंटे, नगरसेवक रमेश जाधव, अ.भा.स.परिषद ता.अध्यक्ष विलास शिंदे, समीर देशमुख, गंगाधर ढोके, भूषण जाधव, ईश्वर इंगळे, राजू गोरे, विष्णू कोलते, डॉ.नईम, राजू चोपडे, विष्णू घोडके, संजय जाधव, सागर जाधव, सुरेश गिराम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांचा सत्कार
जालना : जिल्हा वकील संघाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकील संघाचे अॅड. किशोर राऊत, अॅड. सोपान शेजुळ, अॅड. विलास भुतेकर, अॅड. अंकुश लकडे आदींची उपस्थिती होती.
फोटो
कृषी विज्ञान केंद्रात स्वच्छता पंधरवडा साजरा
जालना : तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस.व्ही. सोनुने, कृषी अभियंता डॉ. पंडित वासरे, अजय मिटकरी, एस. आर. गायकवाड आदींची उपस्थिती होती.