छायाकिंत फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:07+5:302020-12-22T04:29:07+5:30
सातोना येथे कोरोना लसीकरण कार्यशाळा सातोना खु : परतूर तालुक्यातील सातोना खु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शनिवारी आरोग्य विभागाच्या ...

छायाकिंत फोटो
सातोना येथे कोरोना लसीकरण कार्यशाळा
सातोना खु : परतूर तालुक्यातील सातोना खु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शनिवारी आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लसीकरणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी निलवर्ण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत काम करणारे आधिकारी व आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. शिवाजी निलवर्ण, डॉ. संजय लाटे, डॉ. रुपाली चव्हाण, डॉ. भगवती भेंडेकर, आरोग्य पर्यवेक्षक राम अंभुरे यांच्यासह कर्मचाºयांची उपस्थिती होती.
फोटो
आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार
जालना : नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत औरंगाबाद विभागातून भरघोस मताने विजयी होऊन विजयाची हॅट्रिक करणारे आमदार सतीश चव्हाण यांचा शहरातील रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जालना पीपल्स बँकेचे संचालक दिपक भुरेवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, जालना मार्केट कमिटीचे संचालक गोपाल काबलीये, गणेश चौधरी, लखनलाल चौधरी आदींची उपस्थिती होती.
-----------------
फोटो
कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात अभिवादन
जालना : तालुक्यातील नाव्हा येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रा. स्वाती पुराणिक यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्षा प्रा. स्वाती पुराणिक, प्रा. अश्विनी क्षीरसागर, प्रा. चंद्ररेखा गोस्वामी, प्रा. गजानन कदम, अंकुश जाधव, गजानन मेहेत्रे आदींची उपस्थिती होती.
----------------
फोटो
नाभिक सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर
हसनाबाद : हसनाबाद येथील नाभिक सेवा संघाच्या शाखेची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात शाखाध्यक्षपदी गोपाळ सुरडकर तर उपाध्यक्षपदी काकासाहेब काळे, सचिव अंकुश वरपे, कोषाध्यक्ष संदिप कानडे यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी शिवाजी सुरडकर, सुनिल सुरडकर, गणेश सुरडकर, योगेश सुरडकर बाबासाहेब सुर आदींची उपस्थिती होती.