शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:10 IST

केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक महापालिका तसेच अ वर्ग नगर पालिकेने त्यांच्या हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक महापालिका तसेच अ वर्ग नगर पालिकेने त्यांच्या हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जालना पालिकेने जागा निश्चित केली होती. परंतु या जागेचा वाद न्यायालयात पोहोचल्याने हा प्रकल्प आता न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.केंंद्र सरकारच्या स्वच्छ शहर याजने अंतर्गत महापालिका तसेच अ वर्ग दर्जाच्या पालिकेने शहरातून वाहणारे सांडपाणी थेट नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करूनच ते सोडावे असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्यानुसार विशेष निधी देखील देऊ केला आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकल्प जालना पालिकेने उभारावा यासाठी जागाही निश्चित केली आहे. परंतु जी जागा पालिकेने निश्चित केली आहे, त्या जागेवर शेजारील खासगी व्यक्तीने हक्क सांगून हे प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर पुढील महिन्यात सुनावणी होणार असून, त्या नंतरच या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.दरम्यान सामनगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे काम अद्यापही कासवगतीने सुरू असून, शहरातील संपूर्ण कचरा एकत्रित करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती तसेच अन्य साहित्य उत्पादन करण्यासाठी पूर्वी पुणे येथील एका खाजगी कंपनीला हे कंत्राट दिले होते. परंतु या कंपनीने प्रकल्प पूर्ण होण्या आधीच लाखो रूपयांचे बिल उचलून घेतले. नंतर या कंपनीला पालिकेने दंडही आकारला होता. परंतु नंतर हा प्रकल्प या ना त्या कारणाने रखडत गेला आहे.दरम्यान जालना शहरातील डम्पिंग ग्राऊंड असलेल्या रोहनवाडी मार्गावरील कचºयाचे ढीग कमी करण्यासाठी आता पालिकेने पुढकार घेतला असून, तेथे कच-याचे विलगीकरण करण्यासाठी चार कोटी रूपयांचा निधी मंजूर करून त्या कचऱ्यांची विल्हेवाट लावली जात आहे.औद्योगिक वसाहत : स्वतंत्र पुनर्वापर प्रकल्पजालन्यात स्टील उद्योग असल्याने त्या उद्योगाला दररोज कोट्यवधी लिटर पाणी लागते. हे पाणी आणताना उद्योजकांचा मोठा खर्च होता. यामुळे काही उद्योजकांनी पाण्याचे रिसायकलिंग करून त्याचा पुनर्वापर करणे यापूर्वीच सुरू केले आहे. परंतु सर्व उद्योगांना सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना देण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारणीचे प्रयत्न मध्यंतरी उद्योजक आणि पालिकेकडून सुरू होते. ते प्रयत्न देखील सध्या थंड बस्त्यात पडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदGarbage Disposal Issueकचरा प्रश्नgovernment schemeसरकारी योजना