सांडपाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:16+5:302021-01-13T05:19:16+5:30

चालकांना मार्गदर्शन जालना : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोटार निरीक्षक नितीन पाटील यांनी रस्ता ...

Sewage on the road | सांडपाणी रस्त्यावर

सांडपाणी रस्त्यावर

चालकांना मार्गदर्शन

जालना : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोटार निरीक्षक नितीन पाटील यांनी रस्ता सुरक्षेबाबत माहिती दिली. तसेच नियम पालन करण्याचे आवाहन केले.

नार्वेकर यांचा सत्कार

जालना : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकूर यांनी सत्कार केला. यावेळी विक्रम ठाकूर, प्रशांत गडाख, नानासाहेब खेवरे, गिरीश जाधव, योगीराज गाडे आदींची उपस्थिती होती.

कारवाईची मागणी

अंबड : शहर परिसरात अवैधरित्या दारूविक्री वाढली आहे. दारूमुळे भांडण - तंट्यात वाढ झाली आहे. तळीरामांमुळे महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

जालना : शहरातील लक्कडकोट भागात जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यातून वाहने चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Sewage on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.