दहापैकी सात जणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:20+5:302021-07-12T04:19:20+5:30
याबाबत लोकमतने रिॲलिटी चेक केला असता, अनेकांना आपल्या बायकोचा मोबाईल क्रमांक आठवत नसल्याचे समोर आले आहे. लहान मुलांना ...

दहापैकी सात जणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही....!
याबाबत लोकमतने रिॲलिटी चेक केला असता, अनेकांना आपल्या बायकोचा मोबाईल क्रमांक आठवत नसल्याचे समोर आले आहे. लहान मुलांना मात्र आई-बाबांचा मोबाईल क्रमांक ताेंडपाठ आहे, तर मोठ्यांची याबाबत पंचाईत झाली आहे. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांची स्मरणशक्ती चांगली असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. नागरिक आपल्या मेमरीचा वापर करीत नाहीत. यामुळे असे प्रकार घडतात. तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला. परंतु, तो परावलंबी झाला. त्याचा मोबाईल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. प्रत्येकाने रिकॉल मेमरीचा वापर केला पाहिजे, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
‘लोकमत’@सिंधी बाजार
n मला माझ्या बॉसचा मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहे. मात्र, बायकोचा नाही.
n स्मार्ट फोनमुळे नंबर पाठ करण्याची गरजच भासत नाही. प्रत्येक बाबतीत फोनवरच अवलंबून राहावे लागत आहे.
n घरी परतण्याशिवाय पर्याय नसतो. मोबाईलची चार्जिंग संपली की, क्रमांक आठवत नाही. यामुळे क्रमांकांची डायरीत नोंद आहे.
nएकाला आपला आणि पत्नीचा पहिल्यापासून वापरात असलेला नबंर सांगता आला. मात्र, दुसरा नंबर लक्षात राहिला नाही.
पोरांना आठवते, मोठ्यांना का नाही?
मोबाईलवर प्रत्येक व्यक्ती अवलंबून असल्याने, मोबाईलविना जगणे, कामकाज करणे कठीण झाले आहे. लहान मुले क्रमांक पाठ करतात. शॉर्ट मेमरी लाँग टर्म मेमरीत परिवर्तित होते. मोबाईलमुळे मोठी व्यक्ती शॉर्ट कट मेमरीचा वापर करू लागली आहे. - मानसोपचार तज्ज्ञाचा कोट
दररोज पतीदेवाला आवर्जून फोन लावणाऱ्या महिलांनासुध्दा आपल्या पतीचा क्रमांक पाठ नसतो. कारण कोड वर्डमध्ये त्यांनी पतीचा नंबर सेव्ह केलेला असतो. सध्या प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने तो नेहमी त्यात गुंतलेला असतो. - एक गृहिणी
डोक्यात अनेक विचार असतात. त्यामुळे कुठलेच नंबर लक्षात राहात नाहीत. मोबाईलमध्ये सगळे नंबर नावाने सेव्ह असल्याने आठवावे लागत नाहीत. कॉल करताना नंबरच थेट डायल केला जातो. त्यामुळे तो लक्षात राहात नाही.
- एक गृहिणी
माझी शाळा सुटल्यानंतर बाबांना यायला उशीर झाला तर मी शिक्षकांच्या मोबाईलवरून बाबांशी सपर्क करतो. त्यासाठी मला माझ्या आई-बाबांचा मोबाईल क्रमांक पाठ करावा लागला. यातून मला घरी संपर्क करताना अडचण येत नाही. - अभिषेक माने
माझ्या शाळेच्या नोटबूकमध्ये मी माझ्या आई-बाबांचा मोबाईल नंबर लिहून ठेवला आहे. त्यानंतर माझ्या शाळेतील शिक्षक किंवा शिक्षिकांनी विचारल्यानंतर मी लगेच त्यांना सांगतो. माझ्या वडिलांचा नंबर लक्षात आहे.
- गौरव मेहेत्रे
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच
n प्रत्येकाच्या हातात मोबाईल येण्यापूर्वी नातेवाईकांचे लॅंडलाईन नंबर डायरीत लिहून ठेवण्याची सोय होती.
n नेहमीच्या वापरातील फोन नंबर तर अगदी तोंडपाठ असायचे. तसेच एसटीडी बुथमधून फोन करताना डायरीच्या मदतीविना नंबर एसटीडी कोडसह फिरवला जायचा.
n त्यामुळे प्रत्येकाच्या लक्षात मोबाईल क्रमांक राहायचा. परंतु, आता मोबाईलमुळे स्मरणशक्ती कमी होत आहे.