शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:29 IST

जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली.

ठळक मुद्देसंतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. रेशीम कोष निर्मितीमधून एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

- विष्णू वाकडे जालना : जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली. यातून त्यांना एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

संतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात रेशीम उदयोगाचे प्रशिक्षण घेऊन शेतात तुतीची लागवड केली. त्यांना याचा चांगलाच फायदा झाला असून, त्यांनी एकाच वर्षांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. संतोष कचरे यांनी आक्टोबर २०१६ मध्ये २० बाय ५० चे शेड उभारून  अडीच एकर तुतीची लागवड केली. शेतातील विहिरीत जेमतेम पाणी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन केले. यामुळे तुतीला कमी प्रमाणात पाणी लागले.

कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी तुतीला खते, औषधी वापरली. त्यामुळे मालही चांगला आला.  त्यानंतर जुलै २०१७ मध्ये पहिले पीक काढण्यात आले. आणि यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यांनी २०१७-१८  मध्ये सातत्याने रेशीम कोष उत्पादनासाठी अकरा पिके घेतली. प्रत्येक  टप्प्यातून त्यांना सरासरी पावणे दोन क्विंटलपर्यंत रेशीम कोष मिळाले. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील रामनगरमध्ये वर्षभरात अकरा वेळा कोष विक्री केली. यामधून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रत्येक टप्प्यासाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. यातून त्यांनी सात लाखांचा निव्वळ नफा मिळविला. त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी व जगदीश प्रसाद भूतडा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

रेशीम कोष व्यवसायात  २९ दिवस परीश्रम घ्यावे लागतात. यावेळी आपण फक्त अळी संगोपनावर लक्ष दिले. शेडसाठी आपणास अनुदानही मिळाले नाही. तरीही योग्य पध्दतीने खर्च करून रेशी शेती साकारली असल्याचे शेतकरी सतोष कचरे यांनी सांगितले.योग्य व्यवस्थापन करून रेशीम कोष निर्मिती व्यवसायात येणाऱ्या शेतकऱ्यांनी तुतीच्या कडीची लागवडी करण्याऐवजी रोपे लावून तुती वाढविली. यामध्ये तुतीचा पाला महत्तवाचा असतो, असे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी यांनी संगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा