शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्टील कंपनी अपघातातील मृतांची संख्या सातवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:30 IST

औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरुवारी सायंकाळी तप्त लोहरस अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी एकाचा गुरुवारी मध्यरात्री तर इतर तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला

जालना : जालना येथील औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरुवारी सायंकाळी तप्त लोहरस अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींपैकी एकाचा गुरुवारी मध्यरात्री तर इतर तिघांचा शुक्रवारी औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. याबाबत औद्योगिक सुरक्षा संचालकांनी पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात गंभीर त्रुटी असल्याचा ठपका कंपनीवर ठेवला आहे. याबाबत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भारत रामदेव पंडित (३१), अजयकुमार रामसकाल सहानी (२२), रामहितसिंग सिंग (२०), अनिलकुमार ललन ओझा (१९), राकेश रामप्रताप पाल (२६), राजकुमार अशोककुमार सिंग (२५), प्रदीपकुमार रामजी यादव (२५ उत्तरप्रदेश, बिहार) अशी मयतांची नावे आहेत.जालना शहरातील अतिरिक्त एमआयडीसीत ओमसाईराम ही भारूका परिवाराची स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत गुरुवारी लेडरमधील गॅसकोंडीमुळे भट्ठीतील तप्त लोहरस कामगारांच्या अंगावर पडला होता. या घटनेत रामहितसिंग सिंग, भारत रामदेव पंडित, अजयकुमार रामसकाल सहानी या तिघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.औरंगाबादेत उपचार सुरू अनिलकुमार ललन ओझा, राकेश रामप्रताप पाल, राऔद्योगिकजकुमार अशोककुमार सिंग, प्रदीपकुमार रामजी यादव या शुक्रवारी मृत्यू झाला. तर जखमी प्रदीप प्रमोदकुमार राई (२४), मोद मोझमिल अबू निसार (२०), संजिवकुमार आनंद राय (२०), अनिलकुमार नंदूराम (३४) या जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.ठेकेदाराने दिली तक्रारया प्रकरणात गुरुवारी रात्री ठेकेदार अनिलकुमार नंदुराम (उत्तरप्रदेश) यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून कंपनीच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहा जणांवर गुन्हा दाखलया प्रकरणात कंपनीचे मालक राजेंद्र सत्यनारायण भारूका (अजंतानगर, जालना), संचालक जवाहर शंकरलाल डेंबडा (गोपीकिशननगर, जालना), प्रतीक रमेशचंद्र गोहेल (रा. व्यंकटेशनगर, जालना), सुनील सिंग शिवानंद (रा. चंददेवरा ता. लालगंज जि. आजम उत्तर प्रदेश, ह. मु. जालना), शेख जावेद शेख मनू (रा. सत्यमनगर चंदनझिरा, जालना), विनोद नरेंद्र रायवय (रा. पावडा ता. गुराबा सापुर उत्तर प्रदेश, ह.मु. जालना) या सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीन झाल्याचे तपासाधिकारी कोठाळे यांनी सांगितले.औद्योगिक सुरक्षा संचालकांकडून पाहणीशुक्रवारी औरंगाबाद येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक राम दहिफळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक, कामगार अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रत्यक्ष कंपनीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी काही कामगारांशी त्यांनी संवाद साधला. परंतु, जे कामगार जखमी आहेत ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने यातून निष्कर्ष निघाला नसल्याचे दहिफळे यांनी सांगितले.कामगार संघटनेकडून चौकशीची मागणीसिटूचे कामगारनेते आण्णा सावंत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेतली. त्यांनी कंपनीतील अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. हे स्टील उद्योजक कमी जागेत सर्व उत्पादन करतात. त्यामुळे अपघात होत असल्याचे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच हव्या त्या सुरक्षा पुरवत नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार चौकशी होईल असे आश्वासन बिनवडे यांनी सिटूच्या शिष्टमंडळाला दिले.बकेटच्या छिद्रातून गॅस पास न झाल्याने अपघातलोखंडी बिलेट तयार करून त्यानंतर त्याला साच्यात टाकून नंतर लोखंडी सळयांची निर्मिती केली जाते. यासाठी असलेल्या भट्टीत -फर्नेसमध्ये जवळपास १२०० ते १६०० एवढ्या उच्च तापमानात लोखंडाचे पाणी होते. हे पाणी एका बकेटमधून साच्यात ओतताना हा अपघात झाला. या बकेटमधून गॅस बाहेर पडण्यासाठीचे छिद्र ब्लॉक झाल्याने हे पाणी उसळून वर येऊन ते बकेटबाहेर पडल्याने ही दुर्घटना घडली.औरंगाबादेतील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, अन्य दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रदीप राय ९७ टक्के आणि मुज्जमील खान ९६ टक्के भाजले असून, दोघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे.कामगार भेदरलेलेरु ग्णलयाबाहेर अन्य काही कामगार उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेमुळे ते भेदरून गेल्याचे दिसून आले. घटनेविषयी काही सांगणेही त्यांना कठीण जात होते. काहींना भावनाही अनावर झाल्या होत्या.अहवाल सादरशुक्रवारी औरंगाबाद येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक राम दहिफळे यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना सायंकाळी सादर केला. बिनवडे यांनी हा अहवाल कामगार आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आले. या अहवालात कंपनीत काम करणा-या कामगारांच्या सुरक्षेकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नसल्याचे आणि कामगारांना जीव गमावण्यासह गंभीर दुखापती झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातMIDCएमआयडीसीDeathमृत्यू