आई-वडिलांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:17+5:302021-02-14T04:28:17+5:30

वडीगोद्री : वृद्धाश्रमे कमी होण्याऐवजी ती वाढत आहेत. वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी युवकांनी आई-वडिलांची सेवा करावी. घराला मंदिर बनवून ...

Serve the parents | आई-वडिलांची सेवा करा

आई-वडिलांची सेवा करा

वडीगोद्री : वृद्धाश्रमे कमी होण्याऐवजी ती वाढत आहेत. वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी युवकांनी आई-वडिलांची सेवा करावी. घराला मंदिर बनवून कर्तव्य पार पाडावे. आयुष्यात आपल्यासोबत काही येत नाही. केवळ चांगले कर्मच शिल्लक राहतात. ईश्वराकडे भाव असून, तो काही कमी पडू देत नाही, असे हभप भागवत महाराज कणके महाराज यांनी सांगितले.

अंबड तालुक्यातील भामानगर (भांबेरी) येथे ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत भागवत कथा, अंखड हरिनाम सप्ताह‌ाचे आयोजन करण्यात आले आहे होते.

नवनाथा पंथीय असलेले अडभंगनाथ महाराज‌ याच्या तपोभूमी भामानगर (भांबेरी) मध्ये सुरू असलेल्या भागवत कथेमुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. यावेळी भागवत कथेत कणके महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Serve the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.