शिक्षक दाम्पत्याने तयार केले क्यूआर कोडयुक्त स्वाध्याय पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:45+5:302021-01-04T04:25:45+5:30
जालना : जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षक दाम्पत्याने अनोखा उपक्रम राबवीत क्यूआर कोडयुक्त स्वाध्याय पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या ...

शिक्षक दाम्पत्याने तयार केले क्यूआर कोडयुक्त स्वाध्याय पुस्तक
जालना : जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षक दाम्पत्याने अनोखा उपक्रम राबवीत क्यूआर कोडयुक्त स्वाध्याय पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या पुस्तिकेचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निमा अरोरा यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
भोकरदन तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक संतोष खांडेभराड यांनी वर्ग चौथी व त्यांच्या पत्नी वाघ्रूळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आर.डी. नलावडे यांनी वर्ग पहिलीच्या क्यूआर कोडयुक्त स्वाध्याय पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, शिक्षणविस्तार अधिकारी एकनाथ मगर, केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, केंद्रप्रमुख विजय चित्ते, मुख्याध्यापक प्रमोद पवार, शिक्षक सुनील ढाकरके, परमेश्वर बोरुडे, रवींद्र ढोबळे आदींची उपस्थिती होती. शिक्षक दाम्पत्याने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.