राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट संघाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:06+5:302021-02-13T04:29:06+5:30
मंठ्यात जिनिंगला आग मंठा : शहरातील लक्ष्मीनारायण फायबर्स जिनिंगला बुधवारी सकाळी वेस्टेज कापसाच्या गंजीला अचानक आग लागली होती. पालिकेच्या ...

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट संघाची निवड
मंठ्यात जिनिंगला आग
मंठा : शहरातील लक्ष्मीनारायण फायबर्स जिनिंगला बुधवारी सकाळी वेस्टेज कापसाच्या गंजीला अचानक आग लागली होती. पालिकेच्या अग्निशमन वाहनाने वेळेत घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. या घटनेत नुकसान झाले नसल्याची माहिती कपिल अग्रवाल यांनी दिली.
दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप
जालना : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने मंठा, वाटूर, नूतन वसाहत, बदनापूर, भाटेपुरी केंद्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकल्पाधिकारी जोमा मस्ती, गोविंद खुळखुळे, सुभाष क्षीरसागर, कृष्णा वराडे, कैलास कोल्हे, दीपक काळदाते, समर्थ डोंगरे, कौशल्या खरात, सचिन सपकाळ, आसेफ कुरेशी, अमोल ठोकरे, राहुल सोनवणे आदींची उपस्थिती होती.
बाभूळगाव येथे व्याख्यान कार्यक्रम
भोकरदन : तालुक्यातील बाभूळगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महिला वारकरी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षा शिवलीला पाटील यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यान कार्यक्रमाला विजय देवरे, गजानन गाढे, विशाल गाढे, ज्ञानेश्वर माऊली लिंगेवाडीकर, प्रकाश महाराज लिंगेवाडीकर उपस्थित होते.