दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बीज राखी कार्यक्रम घेण्यात आला. महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व तेजस जनविकास संस्था, चनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकारी डाॅ. विकास गटकाळ, रवी गोरे, नाशिर सिद्दीकी, एम. आर. तिडके, उज्ज्वला कांबळे, अनुराधा गाडेकर, शिल्पा
सोनटक्के, वंदना निकम, सुशीला भोई, कुशिवर्ता फलके, सखलादी घाटगे यांना शारदा जैवाळ, सविता निकम यांनी राख्या बांधून रक्षा बंधन साजरे केले. महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने राज्यातील १०० स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविला जात असून, ही बीज राखी कुंडीत किंवा अंगणात रुजवावी आणि त्यापासून उगवणाऱ्या रोपाचे संगोपन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याप्रसंगी तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे, शेखर मुंदडा, मुकुंद शिंदे, सहारा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद, वैशाली अंबिलवादे, सुनीता मगरे, उषा तायडे आदींची उपस्थिती होती.