दाभाडी येथे बीज राखी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST2021-08-27T04:32:47+5:302021-08-27T04:32:47+5:30

दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बीज राखी कार्यक्रम घेण्यात आला. महा एनजीओ फेडरेशन ...

Seed Rakhi program at Dabhadi | दाभाडी येथे बीज राखी कार्यक्रम

दाभाडी येथे बीज राखी कार्यक्रम

दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बीज राखी कार्यक्रम घेण्यात आला. महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व तेजस जनविकास संस्था, चनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय अधिकारी डाॅ. विकास गटकाळ, रवी गोरे, नाशिर सिद्दीकी, एम. आर. तिडके, उज्ज्वला कांबळे, अनुराधा गाडेकर, शिल्पा

सोनटक्के, वंदना निकम, सुशीला भोई, कुशिवर्ता फलके, सखलादी घाटगे यांना शारदा जैवाळ, सविता निकम यांनी राख्या बांधून रक्षा बंधन साजरे केले. महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने राज्यातील १०० स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविला जात असून, ही बीज राखी कुंडीत किंवा अंगणात रुजवावी आणि त्यापासून उगवणाऱ्या रोपाचे संगोपन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याप्रसंगी तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे, शेखर मुंदडा, मुकुंद शिंदे, सहारा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद, वैशाली अंबिलवादे, सुनीता मगरे, उषा तायडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Seed Rakhi program at Dabhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.