शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल हादीच्या घराची झडती; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 13:13 IST

जालन्यात पीएफआयवर धाड : पोलिसांकडून लाठीमार

लाेकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अब्दुल हादी अब्दुल मोमीन या पीएफआय या संघटनेच्या  खजिनदारास  एटीएसने गुरुवारी जळगाव येथे अटक केली होती. त्या संशयितास शुक्रवारी दुपारी जालन्यात आणून त्याच्या घराची झडती घेतली. या वेळी लॅपटॉपसह अन्य कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी पीएफआयच्या समर्थकांनी रेहमानगंज या भागात निदर्शने करून अब्दुलच्या घराची झडती घेण्यास विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे सांगण्यात आले. 

पीएफआय या संघटनेच्या जालन्यासह अन्य ठिकाणी एनआयए आणि एटीएसने छापेमारी केली होती. त्यात जालन्यातून दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जालन्यातील पीएफआय या संघटनेचा सक्रिय पदाधिकारी अब्दुल मोमीन रौफला जळगाव येथे अटक केल्यावर दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात दुपारी साडेतीन वाजता जालन्यातील रहेमानगंज येथील अब्दुल  रौफ मोमीन याच्या घराची तपासणी करण्यासाठी एटीएसच्या पथकातील काही अधिकारी हे त्याला घेऊन हजर झाले होते. हे कळताच परिसरातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या परिसरात जमा होऊन कारवाईस विरोध करत होते. अब्दुल रौफ मोमीन हा निर्दोष असून, त्याला सोडून द्यावे, अशा घोषणा देत होते. प्रथम पोलिसांनी या जमावाला शांत राहून आम्हांला आमचे काम करू द्या, असे सांगितले. परंतु जमाव शांत होत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. 

पीएफआयकडून निदर्शने देशात आणि राज्यात एनआयए आणि एटीएसने केलेल्या कारवाई विरोधात शुक्रवारी दुपारी मामा चौकात अचानक निदर्शने केली. ही निदर्शने करताना कुठलीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या निदर्शनाचे फुटेज तपासून दोषींवर नंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalanaजालना