शास्त्रज्ञ पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:33 IST2019-08-24T00:32:32+5:302019-08-24T00:33:16+5:30
दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी जालना तालुक्यातील वखारी येथे भेट दिली.

शास्त्रज्ञ पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
जालना : पूर्वी शेतक-यांच्या पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयांना कृषी अथवा अन्य संस्थाकडे विनवण्या कराव्या लागत असत, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आता शास्त्रज्ञांचे पथक थेट शेतक-यांच्या बांधावर येत असल्याने शेतक-यांना मोठा दिलसा मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी जालना तालुक्यातील वखारी येथे भेट दिली.
वखारी येथे जवळपास ७५ एकर परिसरात कपाशीची लागवड केली आहे. या एकात्मिक लागवडीतून कपाशीवर हल्ला करणारी शेंदरी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार प्रती १६ एकर परिसरात कामगंध सापळे लावून या अळीवर नियंत्रण मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी दिल्ली येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजंता बिराड, डॉ. अनुपकुमार, डॉ. मुकेश खोकर, डॉ. ए.के. कनोज बंगळूर येथील शास्त्रज्ञ डॉ. रिचा वार्ष्णोय, डॉ. ओमप्रकाश नाविक यांची उपस्थिती होती. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील किटनाशक शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी वखारी येथील शेतक-यांमध्ये आणि शास्त्रज्ञांमध्ये संवाद घडवून आणला. शेतकºयांना येणाºया अडचणी मिटकरी हे शास्ज्ञांना मराठीतून समाजावून सांगत होते. यावेळी डॉ. रिचा वार्ष्णोय यांनी बोंड अळीबाबत मार्गदर्शन केले.