शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:56 PM2020-12-25T12:56:16+5:302020-12-25T12:56:40+5:30

आनंद साळवे हा बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या वडिलांसोबत शेतात जात होता.

A schoolboy dies after falling into a well while going to the field | शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू 

शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू 

Next

भोकरदन (जि. जालना) : शेतात जाताना विहिरीत पडल्याने एका १६ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील कुंभारी येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंद संतोष साळवे (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. आनंद साळवे हा बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या वडिलांसोबत शेतात जात होता. वडील शेतात गेल्यानंतर मागे येणारा मुलगा दिसला नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात पाहणी केली असता शेताजवळील एका विहिरीत तो पडल्याचे दिसून आले. त्यांनी अरडाओरड करून इतर नागरिकांच्या मदतीने आनंद साळवे याला विहिरीबाहेर काढले. त्याला तात्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आनंद साळवे हा भोकरदन शहरातील न्यू हायस्कूलमध्ये शिकत होता. त्याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण, असा परिवार आहे.

Web Title: A schoolboy dies after falling into a well while going to the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.