सावित्रीबाई फुले जंयती बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:54+5:302021-01-04T04:25:54+5:30
जालना : सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, विविध शाळा, महाविद्यालयांत कार्यक्रमांचे ...

सावित्रीबाई फुले जंयती बातम्या
जालना : सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, विविध शाळा, महाविद्यालयांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
फोटो ओळ
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावित्रीच्या लेकी.
---------
फोटो आहे
राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध
पारध : येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजाराम डोईफोडे, उपप्राचार्य अमोल बांडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास लोखंडे, सुधाकर शिरसाठ, प्रा. धनराज भोसले, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. दिनेश कापरे, प्रा. लक्ष्मण खरात, प्रा. अर्जुन राजबिंडे, अनिल लक्कस, ज्ञानेश्वर अल्हाट, राजेंद्र जाधव, निलेश लोखंडे, प्रा. अश्विनी कायंदे, प्रा. स्वरांजली जंगले आदींची उपस्थिती होती.
---------
फोटो आहे
अंगणवाडी केंद्रात कार्यक्रम
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील अंगणवाडी केंद्रात सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती प्रिया मांडवे, रजनीबाई देशपांडे, पद्मछाया वनगुजरे, मदतनीस मंगल देवकर, द्वारका बरवे, कमल वरखडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा व अंगणवाडीत महिलांचा सत्कार करण्यात आला.
----------
जिल्हा परिषद शाळा, विटा
हसनाबाद : विटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.