शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांसमोर सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:59 IST

रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जालना मतदार संघातील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, पं.स. सभापती, उपसभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य यांच्यासह सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.यावर्षी जालना तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. परंतु, तरीही तालुक्यातील काही गावांना मार्चनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण आज ही बैठक बोलवली असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. त्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांकडून गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. काही सरपंचांनी ग्रामसेवकांनी बैठकीची पूर्वकल्पना दिली नसल्याचे सांगितले. या मुद्यांवरून त्यांनी संबंधित ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले.त्यानंतर प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी पाणीटंचाईची माहिती दिली. पाईपलाईन दुरूस्ती, हातपंप दुरूस्ती, बोअरची दुरुस्ती, पाणीटंचाई निवारणार्थ बोअर, विहीर घेणे, रोहित्र उपलब्ध करून देणे, विहिरींचा गाळ काढणे आदी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या आढावा बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महावितरणच्या अधिका-यांची उडाली भंबेरीजालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु, रोहित्र नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्र्माण होत आहे. रोहित्र नसणे, रोहित्रावर लोड येणे, पोल खराब होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून, ज्या गावांना रोहित्राची गरज आहे. तेथे तातडीने रोहित्र देण्यात यावे, अशी मागणी काही सरपंचांनी केली. याबाबत आ. गोरंट्याल यांनी महावितरणच्या अधिका-याला विचारले असता, उत्तर देताना अधिका-याची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर आ. गोरंट्याल यांनी ज्या गावांना रोहित्राची गरज आहे, त्या गावांना तातडीने रोहित्र देण्याचे सांगितले.कडवंचीला करणार मॉडर्न व्हिलेजजालना तालुक्यातील कडवंची हे गाव जगाच्या नकाशावर आहे. या गावाला भेट देण्यासाठी नेहमी देशभरातील लोक येतात. परंतु, या गावाला जाणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील पूलही मोडकळीस आला आहे. या पुलाच्या कामाचे अनेक वेळा नारळ फोडण्यात आले. परंतु, अद्यापही पुलाचे काम झाले नाही. कडवंची हे आदर्श गाव आहे. त्यामुळे या गावाला आपण येणा-या काळात मॉर्डन व्हीलेज करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंचांसह पदाधिका-यांनी गावा- गावातील समस्याही यावेळी मांडल्या.

टॅग्स :MLAआमदारJalna z pजालना जिल्हा परिषदsarpanchसरपंचwater shortageपाणीकपातcivic issueनागरी समस्या