शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्तीसह इतर प्रक्रिया ...

जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्तीसह इतर प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीतील बहुमताने विजयी पॅनलच्या प्रमुखांनी सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी दक्षता घेत नियोजन केल्याचे दिसत आहे. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १० फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडणूक झाली आहे. तर १२ फेब्रुवारीला शुक्रवारी उर्वरित ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी दुधनाकाळेगाव, बठाण बुद्रूक, विरेगाव, माळशेंद्रा, कडवंची, वडगाव, बापकळ, सिरसवाडी, पोखरी शिंगाडे, घेटुळी उखळी, काकडा निपाणीपोखरी, नसडगाव पाथ्रुड, वरखेड, नेर, ममदाबाद, भिलपुरी खुर्द, मौजपुरी, वडीवाडी, वखारी, हिवरा रोषणगाव, सामनगाव, धांडेगाव, गुंडेवाडी, वंजारउमरद, पळसखेडा, तांदुळवाडी बुद्रूक, गोलापांगरी, पारेगाव, रेवगाव, माळेगाव खुर्द, सोमनाथ जळगाव, रोहनवाडी, बेथलम, कारला आणि चितळीपुतळी या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड होणार आहे.

गाव विकासाचे आव्हान

ग्रामीण भागात आजही बहुतांश समस्या असून, स्वच्छता, आरोग्य, बेरोजगारी आदी एक ना अनेक प्रश्न गावागावात आहेत. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांसमोर हे प्रश्न सोडविण्याचे आव्हान राहणार आहे. त्यात महिलांशी निगडित गावपातळीवरील समस्यांचाही डोंगर उभा आहे. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांसमोर या समस्या सोडविण्याचे आव्हान राहणार आहे.

या गावांत राहणार महिलाराज

लोंढ्याची वाडी, पाचनवडगाव, हिस्वन बुद्रूक, इस्लामवाडी, पोकळवडगाव, जामवाडी, कचरेवाडी, खरपुडी, दरेगाव, देवमुर्ती, तांदुळवाडी खुर्द, गोंदेगाव, मानेगाव जहागीर, जळगाव सोमनाथ, शिवणी, राठोडनगर, शंभूसावरगाव, हातवन, सेवली, धारकल्याण, वानडगाव, इंदेवाडी, बाजीउम्रद, निधोना, सिंधीकाळेगाव, बठाण बुद्रूक, कडवंची बापकळ, पोखरी शिंगाडे, घेटोळी उखळी, नसडगाव, वरखेड, नेर, वखारी, हिवरा रोषणगाव, वंजार उमरद, पळसखेडा, तांदुळवाडी बुद्रूक, गोलापांगरी, पारेगाव, माळेगाव खुर्द, सोमनाथ जळगाव, रोहनवाडी आणि कारला आदी गावांत महिलाराज असणार आहे.