मुरमा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्जेराव राठोड, तर उपसरपंचपदी शामराव मुकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:30+5:302021-02-13T04:29:30+5:30
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्जेराव राठोड, तर उपसरपंचपदी शामराव मुकणे यांची बिनविरोध निवड झाली. ...

मुरमा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्जेराव राठोड, तर उपसरपंचपदी शामराव मुकणे
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्जेराव राठोड, तर उपसरपंचपदी शामराव मुकणे यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे खंदे समर्थक व समर्थ बँकेचे संचालक तथा यशवंत सहकारी जिनिंग- प्रेसिंगचे चेअरमन शामराव मुकणे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीस वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. एकहाती सत्ता ठेवण्यास गावकऱ्यांच्या सहकार्याने यश आले आहे. शुक्रवारी सरपंचपदाच्या निवडणुकीत सर्जेराव राठोड यांची सरपंचपदी, तर पॅनलप्रमुख शामराव मुकणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित सदस्य सरस्वती उढाण, दिनकर मुकणे, पार्वतीबाई शिंदे, पुष्पाबाई मुकणे, अलका पवार, अरुणा गपाट, कौशल्याबाई पटेकर यांची उपस्थिती होती. या निवडीचे पालकमंत्री राजेश टोपे, सागरचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, जि.प. उपाध्यक्ष महेंद्र पवार, सुदाम मुकणे, गंगाधर मुकणे, महेश कोल्हे, अर्जुन मुकणे, दिलीप मुकणे, रुस्तुम उढाण, संभाजी उढाण, रघुनाथ मुकणे, बापूराव जाधवर, श्याम पवार, योगेश ढोणे, राधाकृष्ण रणपिसे, बाबासाहेब मुकणे, बिभीषण गपाट, प्रभाकर पटेकर, महादेव थुटे, सिद्धार्थ भानुसे, ज्ञानदेव मुळे, शिवशंकर जंगले, अंकुश फराटे, अमोल मुकणे, महेश शिंदे, विलास आढे आदींनी स्वागत केले.