संस्कृत सर्व भाषांची जननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:03+5:302021-08-23T04:32:03+5:30
संस्कृत भाषा प्रचार समिती जालना संचालित श्रीराम संस्कृत विद्यालय व ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ संग्रहालय ...

संस्कृत सर्व भाषांची जननी
संस्कृत भाषा प्रचार समिती जालना संचालित श्रीराम संस्कृत विद्यालय व ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाच्या श्रीरामशास्त्री सांस्कृतिक सभागृहात संस्कृत दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय संस्कृत ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्कृत भाषा प्रचार समितीच्या उपाध्यक्ष जयश्री कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून महेश सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष विजयकुमार दाड, ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी, श्रीराम वाचनालयाचे उपाध्यक्ष संस्कृत पंडित सुधाकर भालेराव, श्री भगवती पुरोहित संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संस्कृत पंडित, ज्योतिषाचार्य तथा सत्कारमूर्ती राजेश सामनगावकर, श्रीराम वाचनालयाचे सचिव श्रीकांत शेलगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी राजेश सामनगावकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर जयश्री कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले. आभार अनघा भावठाणकर यांनी मानले. यावेळी मोहिनी शेलगावकर, नितीन बावणे, प्रल्हाद बिल्लारे, सय्यद युनूस, सखाराम बोरूळ, रामेश्वर चौंडीये, सुभाष घारे, प्रमोद जोशी, शैलेंद्र बदनापूरकर यांच्यासह वाचकांची उपस्थिती होती.
फोट