वाळू तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:31 IST2018-01-28T00:31:02+5:302018-01-28T00:31:31+5:30
गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

वाळू तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर पकडले
शहागड : गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
शहागड-वाळकेश्वर या दोन गावातील अवैध वाळू तस्करी बंद करण्यात महसूलच्या पथकाला यश आले असले तरी, गोरी-गंधारी, डोमलगाव, आपेगाव, कुरण, गोंदी, जोगलादेवी या गावांमधील अवैधवाळू तस्करांचा गोंगाट अजूनही कायम आहे. आठ दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोगलादेवी नदीच्या पात्रातील अवैधवाळू तस्करांविरूध्द कारवाई करत ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. शनिवारी सकाळी कुरण गोदापात्रात पंधरा ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करत असल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्र सुरवसे यांना मिळाली होती. शनिवारी सकाळी आठला कुरणला पाच ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी पकडले तर आठ-दहा ट्रॅक्टर पळून गेले.
-----------
अधिका-यांमध्ये शाब्दिक चकमक
गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्र सुरवसे यांनी अचानक कूरण परिसरातील अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर पकडल्यानंतर तलाठी अभिजित देशमुख गोंदी पोलीस ठाण्यात गेले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तलाठी अभिजित देशमुख यांनी घडला प्रकार तहसीलदार दत्ता भारस्कर यांना सांगितला.
---------
नळणी शिवारातही कारवाई
भोकरदन : नळणी येथून अवैध वाळू वाहतूक वाहतुक करणारा एक हायवा व एक ट्रॅक्टर भोकरदन पोलिसांनी शनिवारी पकउला. या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरूध्द गुन्हा दाखल करून तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी रात्री भोकरदन पोलिसांनी नळणी शिवारात ही कारवाई केली. चालक संतोष देविदास ठोंबरे (रा.जवखेडा ठोंबरे) व मालक गजानन सर्जेराव ठोंबरे, अशी गुन्हा दाखल दोघांची नावे आहेत. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सांखळे तपास करीत आहेत.