शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जोगलादेवीत वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:31 IST

घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेली साडेचार हजार ब्रास वाळू जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेली साडेचार हजार ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई बुधवारी तहसीलदार संजयकुमार ढवळे यांनी केली. त्यानंतर पाहणी करून ही वाळू जप्त करण्यात आली.गोदावरीत पाणीसाठा नसल्याने गोदाकाठच्या रामसगाव, जोगलादेवी, शेवता, बानेगाव, लिंगसेवाडी, भोगाव, मंगरूळ इ. गावांतून सर्रासपणे अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. ही माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी लेखी स्वरुपात घनसावंगीच्या तहसीलदारांना कळविले. यामध्ये कारवाईसंदर्भात सुचविले होते. हे पत्र मिळताच बुधवारी घनसावंगीचे प्रभारी तहसीलदार संजयकुमार ढवळे, तलाठी के.एस.घारे, चार कोतवाल, दोन शस्त्राधारी पोलीस यांचे पथक जोगलादेवी पोहोचले. येथे पाहणी केली असता ३० ते ४० साठे आढळून आले. केवळ येथे जवळपास साडेचार ते पाच हजार ब्रास वाळू होती. त्यातील लिलाव झालेल्या पण न उचललेली अंदाजे २२०० ब्रास बाळू साठा सोडला तर जवळपास अडीच हजार ते २८०० ब्रास वाळूचे पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. यामुळे वाळू साठा करणारे आणि वाळू वाहतूकदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग