पथकाला पाहताच वाहनासह वाळू माफिया फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:31+5:302020-12-22T04:29:31+5:30
तळणी : वाळू माफियांच्या खबऱ्याला चकवा देण्यासाठी महसूलच्या पथकाने नवरदेवासाठी सजविलेल्या कारचा वापर करून शनिवारी रात्री नायगाव शिवारात एका ...

पथकाला पाहताच वाहनासह वाळू माफिया फरार
तळणी : वाळू माफियांच्या खबऱ्याला चकवा देण्यासाठी महसूलच्या पथकाने नवरदेवासाठी सजविलेल्या कारचा वापर करून शनिवारी रात्री नायगाव शिवारात एका वाहनावर कारवाई केली; परंतु महसूलचे पथक असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन तेथून पळवून नेले.
पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूलच्या पथकाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी रात्री नवरदेवासाठी सजविलेले एक वाहन कारवाईसाठी घेण्यात आले. या वाहनातून अंभोरा शेळके सज्जाचे तलाठी जी. आर. कुटे, तळणी सज्जाचे नितीन चिंचोले सहकाऱ्यांसमवेत जात होते. नायगाव शिवारात एका वाहनात वाळूची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या वाहनाला ओव्हरटेक करून थांबविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला; परंतु ते महसूलचे पथक असल्याचे लक्षात येताच त्या वाहन चालकाने त्याचे वाहन रिव्हर्स घेऊन शेतरस्त्याने पळवून नेले. त्या वाहनाचा पाठलाग करून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, अहवाल सोमवारी तहसीलदारांकडे सादर करण्यात आला आहे.