तालुक्यात २८० घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST2021-06-10T04:20:54+5:302021-06-10T04:20:54+5:30
कारवाईची मागणी अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत ...

तालुक्यात २८० घरकुलांना मंजुरी
कारवाईची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
खराब रस्त्यामुळे चालकांची कसरत
जालना : शहरातील मोतीबाग येथून गांधीचमनकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यात शनिमंदिर ते गांधीचमन या मार्गावर अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे खराब रस्ता आणि वाहतूक कोंडीतून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय, अपघाताचाही धोका वाढला आहे. संबंधितांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका
रोहिलागड : अंबड-डाभरूळ मार्गावरील रोहिलागड जवळील वळण धोकादायक झाले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
खंडित वीजपुरवठा, ग्राहकांची गैरसोय
अंबड : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विविध कामकाजावर याचा परिणाम होत आहे. शिवाय उकाड्याने त्रस्त झालेले नागरिकही हैराण होत आहेत. ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी
जालना : जालना ते वडीगोद्री या महामार्गावरील अनेक दिशादर्शक, सूचनाफलक गायब झाले आहेत. दिशादर्शक, सूचना फलकांअभावी चालकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शिवाय अपघातप्रणव क्षेत्रात अपघाताचाही धोका वाढला आहे. ही बाब पाहता संबंधितांनी गरजेनुसार सूचना फलक, दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.